शब्द (Words)
कधी शब्द हे सख्या सारखे, मन भुलवणारे
कधी शब्द हे गनिमासारखे, वेळेवर न सुचणारे
कधी शब्द हे शिंपल्यातील मोती, चेहेऱ्यावर हसू फुलवणारे
कधी शब्द हे काटेरी, हृदय विदीर्ण करणारे
कधी शब्द हे मोरपीस, हळुवार दुःखावर फुंकर घालणारे
कधी शब्द हे रेशीम धागे, नाते अलगत जपणारे
कधी शब्द हे दहकते अग्नी, इच्छा जाळून टाकणारे
कधी शब्द हे तलम वस्त्र, भावना अलगद उलगडणारे
कधी शब्द हे दवबिंदू, क्षणात सुखावणारे
या शब्दांची कमाल न्यारी, कधी हसवते कधी रडवते
पण शब्दावाचून जग, सुने सुने भासते…..
It’s difficult to find knowledgeable people for this topic, however, you seem like you know what you’re talking about! Thanks